Breaking News

उर्जित पटेल यांना संसदीय समितीकडून तिस-यांदा पाचारण

नवी दिल्ली, दि. 06 - रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांना संसदीय समितीकडून तिस-यांदा पाचारण ण्यात आले आहे. निश्‍चलीकरणा-या निर्णयाबाबत व  रोखविरहव्यवस्थेशी निगडीत मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी त्यांना समितीपुढे बोलावण्यात आले आहे. 
रोखविरहीत अर्थव्यवस्थेसाठीची प्रक्रिया धिम्या गतीने सुरू असल्याचा दावा भारतीय बँकांच्या संघटनेने केला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर संसदीय समितीकडून उर्जित पटेल  यांना समन्स बजावण्यात आले आहे. नोटाबंदीच्या निर्णयानंतर आतापर्यंत बँकांमध्ये किती जुन्या नोटा जमा करण्यात आल्या आणि सध्याची चलनीकरणाची प्रक्रिया  कशाप्रकारे सुरू आहे, हे जाणून घेण्यासाठी संसदीय समितीने यापूर्वीही पटेल यांना समन्स बजावले होते. समितीतील सदस्याने दिलेल्या माहितीनुसार पटेल पुढील  आठवड्यात समितीसमोर उपस्थित राहतील असा अंदाज आहे.