Breaking News

फुटीरतावादी नेता यासीन मलिकला अटक

श्रीनगर, दि. 06 - जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंटचे प्रमुख यासीन मलिकला अटक करण्यात आली आहे. सोमवारी फुटीरतावादी नेत्यांच्या बैठकीपूर्वी यासीन मलिकला  ताब्यात घेण्यात आले. यापूर्वी रविवारी राष्ट्रीय तपास यंत्रणेने पाकिस्तानकडून आर्थिक रसद पुरवठा होत असल्याच्या आरोपावरून फुटीरतावादी नेते व त्यांच्या  निकटवर्तीयांच्या ठिकाणांवर छापे टाकले होते.
राष्ट्रीय तपास यंत्रणेने केलेल्या कारवाईनंतर फुटीरतावादी नेत्यांनी सोमवारी श्रीनगरमध्ये बैठक बोलवली होती. यासीन मलिक शिवाय मीरवाइज फारूक यांनाही  त्यांच्या निवासस्थानात नजर कैदेत ठेवण्यात आले आहे. ही बैठक सैय्यद अली गिलानी यांच्या निवासस्थानी होणार होती. त्यामुळे तेथेही पोलीस दल तैनात करण्यात  आले आहे.