Breaking News

लहुजी साळवे मातंग आयोगाच्या शिफारशींची तात्काळ अंमलबजावणी करा : विजय अंभोरे

बुलडाणा, दि. 06 - क्रांतीवीर लहुजी मातंग अभ्यास आयोगाच्या मंजुर शिफारशींच्या अंमलबजावणी साठी समाजातील युवकांनी पुढाकार घेवुन लढा उभारावा असे आवाहन मातंग अभ्यास आयोगाचे माजी सदस्य विजय अंभारे यांनी मलकापुर येथील लॉयन्स क्लब येथे मातंग समाज कार्यकर्ता बैठक दि 4 जुन रोजी आयोजन केले होते.
म्हणाले की, उपक्षित मातंग समाजाचा आजही सवागिण विकास पाहिजे त्या प्रमाणात झालेला दिसत नाही. आजही समाजाची अवस्था हि स्वातंत्र्यापुर्वी जशी होती तशीच आहे, समाजाच्या विकासाच्या दृष्टीने चालना देण्यासाठी एकसंघ संघठन निर्माण झाल्या शिवाय तरणोपाय नाही त्यामुळे समाजातील सुशिक्षीत युवकांनी समाजाच्या विकासाची धुरा खांद्यावर घेवुन समजा प्रगती पथावर कसा नेता येईल याचा विचार करावा तसेच समाजामध्ये जनजागृती निर्माण करून समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचवुन शिक्षणाच्या मुख्यप्रवाहात समाजाला सामील करून घेण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करायला हवे जो पर्यंत समाजामध्ये शिक्षणाचे प्रमाण वाढणार नाही तोपर्यंत हा समाज संघटीत होणार नाही व संघटीत झाल्या शिवाय समाजाचा विकास होणार नसल्याचे प्रतिपादन सुध्दा त्यांनी यावेळी बोलतांना त्यांनी केले.
यावेळी बैठकीमध्ये मातंग समाजाचे जेष्ठ नेते संताराम तायडे, कैलासराव खंदारे, बि.के.खरात, निवृत्ती तांबे, श्रीकृष्ण शिंदे, राजेंद्र वानखेडे, विजय पारेकर, सोपान पानपाटील, मेजर शंकर आव्हाड, लक्ष्मण सुरडकर, लसाकमचे एस.के.वानखेडे, भगवान चंदनशिव, आदी प्रमुख मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले.
या बैठकीच्या नियोजना बाबत ची माहिती सांगतांना निवृत्ती तांबे यांनी समाजाची दिशा आणि दशा यावर विचार व्यक्त करून बुलडाणा जिल्ह्यात नव समाज निर्मीतीसाठी जन आंदोलन उभे करण्यासाठी मातंग समाजाच्या व्यासपीठा बाबत माहिती दिली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुरेश वानखेडे, श्रीकृष्ण शिरगोळे, मारोती अडायके, हरिडिगांबर हिवाळे, सोनु चंदनशिव, संतोष बोरले, दिपक तायडे, आकाश जाधव, रामेश्‍वर पानपाटील, शरद सुरडकर, राजु सुरडकर, श्रीकृष्ण वानखेडे, शाम जाधव, बंडु तायडे, सोपान सोनोने, गोविंदा वानखेडे, बाळु सोमणकर आदिंनी अथक परिश्रम घेतले.