उज्वला गॅस योजना महिला व पर्यावरणासाठी लाभदायी - मुक्ता टिळक
अहमदनगर, दि. 08 - केंद्र सरकारने देशातील सामान्य माणसाला केंद्रबिंदू ठेवून अनेक चांगल्या योजना आणल्या आहेत. उज्वला गॅस योजनेमुळे वर्षानुवर्षे चुलीवर स्वयंपाक करणा-या गोरगरीब महिलांची धुरापासून मुक्तता झाली आहे. त्यांचे आरोग्यमान चांगले राहण्याबरोबरच लाकूडफाट्याचा वापर कमी झाल्याने पर्यावरण रक्षणाच्या कामालाही हातभार लागला आहे,असे प्रतिपादन पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी केले.
केंद्राच्या उज्वला गॅस योजनेंतर्गत नगरमधील लाभार्थी महिलांना गॅस शेगडी व टाकी वितरणाचा कार्यक्रम सहकार सभागृहात महापौर टिळक यांच्या हस्ते झाला.यावेळी त्या बोलत होत्या.कार्यक्रमास खा.दिलीप गांधी,उपमहापौर श्रीपाद छिंदम, नगरसेवक सुवेंद्र गांधी,किशोर बोरा,शैलेश मुनोत,संगिता खरमाळे,सुनील रामदासी,श्रीकांत साठे,बीपीसीएल कंपनीचे विक्रम गुप्ता, इंडियन ऑईल कंपनीच्या कविता टिको,सारांश साहू,उज्वला गॅस योजनेचे प्रतिक महाले आदी उपस्थित होते.यावेळी महापौर टिळक यांच्यासहीत उपस्थित पाहुणयांचया हस्ते हस्ते लाभार्थी महिलांना गॅस सिलेंडर व शेगडीचे प्रातिनिधीक स्वरुपात वितरण करण्यात आले.कार्यक्रमात बोलताना खा.दिलीप गांधी म्हणाले की,केंद्रातील मोदी सरकारने मागील तीन वर्षात राबविलेल्या योजनांमुळे गोरगरीब जनतेच्या जीवनात मोठे परिवर्तन झाले आहे.मुद्रा लोन योजनेतून सर्वसामान्यांना पत देण्यात आली.यानंतर पंतप्रधान मोदींनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत देशातील 2 कोटी लोकांनी गॅस सबसिडी सोडली. यातून मिळालेल्या साडेआठ हजार कोटींच्या निधीतून उज्वला गॅस योजना राबविण्यात आली.या योजनेमुळे कोट्यवधी महिलांना स्वयंपाकासाठी चांगले इंधन उपलब्ध होवून त्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत झाल्याचे खा.गांधी यांनी सांगितले.बीपीसीएल कंपनीचे विक्रम गुप्ता यांनी सांगितले की,2009 पर्यंत 5 कोटी लाभार्थींना उज्वला गॅस योजनेचा लाभ देण्याचे उद्दीष्ट ठरविण्यात आले आहे.एक वर्षात 2.3 कोटी लाभार्थींना गॅस जोडणी देण्यात आली आहे.या योजनेमुळे भारताची गॅस आयातही वाढली आहे. नगर जिल्ह्यात अडीच लाख लाभार्थींना योजनेचा लाभ देण्याचे उद्दीष्ट आहे.खासदार दिलीप गांधी यांच्या पाठपुराव्यामुळे कंपन्यांनाही मोठ्या प्रमाणात कनेक्शन देण्यात यश आले आहे.स्वयंपाकासाठी लाकूड,रॉकेलचा वापर कमी झाल्याने पर्यावरण रक्षणाच्या कार्यालाही मदत झाली असल्याचे त्यांनी सांगितले.या कार्यक्रमास भारत पेट्रोलियम,इंडियन ऑईल,हिंदुस्तान ऑईल आदी कंपन्यांचे अधिकारी,योजनेचे लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.गॅस सिलेंडर प्रत्यक्ष मिळाल्याने उपस्थित महिलांच्या चेह-यावर आनंद ओसंडून वाहत होता.