स्वतंत्र मराठवाडयाचे मोजकेच समर्थक,जनतेने फिरवली पाठ
औरंगाबाद, दि. 08 - स्वतंत्र मराठवाड़याची भूमिका घेऊन स्थापन करण्यात आलेल्या मराठवाडा मुक्तीमोर्चाच्या वर्धापनाच्या कार्यक्रमाकडे मंगळवारी सर्वसामान्यांनी पाठ फिरवल्याने या कार्यक्रमाचा फज्जा उडाला.व्यासपीठावर पाच आणि सभागृहात 25 अशी उपस्थिती होती. या कार्यक्रमाला निमंत्रित केलेले राजू शेटटी ही आले नाहीत. या मागणीसाठी पुर्व आयोजित कार्यकमास आलेल्या माजी महाअभियोक्ता श्रीहरी अणे यांच्यावर शिवसैनिकांनी हल्ला केल्याच्या पार्श्वभूमीवर आताही पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता.
छोट़या राज्यांचा लवकर विकास होतो,असे सांगत प्रा. बाबा उगले यांनी हा मंच स्थापन केला आहे. या मागणीला पुढे रेटण्यासाठी राज्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांना मंगळवारी निमंत्रित करण्यात आले होते. मात्र, ते औरंगाबादला आलेच नाहीत.
स्वतंत्र मराठवाडा राज्याच्या मागणीला विरोध असल्याने मौलाना आझाद रिसर्च इन्स्टिट़यूटमध्ये पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता. मात्र, या कार्यक्रमाकडे लोकांनी पाठ फिरवली.
जे. के जाधव, द्वारकाभाऊ पाथ्रीकर, गणेश चौधरी व अॅड. प्रदीप देशमुखसह पाचजण व्यासपीठावर आणि मोजून 25 जण सभागृहात असे चित्र होते. स्वतंत्र मराठवाडा राज्य झालेच पाहिजे अशा घोषणा कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी देण्यात आल्या. तेलंगणा, उत्तराखंड या प्रदेशाची प्रगती स्वतंत्र राज्यनिर्मितीनंतर
झाल्याचा दावा या वेळी प्रा. उगले यांनी केला. राजु शेटटी या कार्यक्रमाला का येणार होते? स्वतंत्र मराठवाडयाला त्यांचा पाठिंबा आहे काय? याची चर्चा आता शहरात आहे. कार्यक्रमाच्या फलकावर तेच प्रमुख अतिथी असल्याचे म्हटले असल्याने त्यांची स्वतंत्र मराठवाड़याविषयी भूमिका काय, याची उत्सुकता लागली आहे. या कार्यक्रमासाठी 40 पोलीस कर्मचारी आणि चार अधिकारी बंदोबस्तास होते. तेवढेही कार्यकर्ते सभागृहात नव्हते. त्यामुळे स्वतंत्र मराठवाड़याचे मोजकेच समर्थक असे चित्र दिसून येते.