वसाळापूर्व नाले व गटर सफाई योग्य प्रकारे झाली नसल्याचा आरोप
नवी मुंबई, दि. 08 - पावसाळापूर्व नाले व गटर सफाई योग्य प्रकारे झाली नसल्याचा आरोप आज स्थायी समितीतील अनेक नगरसेवकांनी केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अशोक गावडे म्हणाले की, माझ्या प्रभागात नाले सफाई झाली नाही. जानेवारी पासूनच याची प्रक्रिया व्हायला पाहिजे होती. नालेसफाईवर अधिकारी काम करत नाहीत का, आता नालेसफाई का झाली नाही याचे प्रशासनाने उत्तर द्यावे. देवीदास हांडे पाटील म्हणाले की, वाशीच्या नाल्यातून गाळ काढला व गार्डनमध्ये टाकला. तेथे सुशोभिकरण करून गार्डन केले हे कोणाचे डोके होते, असा तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांना टारगेट करत प्रश्न केला. तसेच मुंढे यांना गझनिची उपमा देत गझनिच्या महमंदनेही चांदीच्या नाण्या ऐवजी सोन्याची नाणी आणली होती. तसा हा प्रकार झाला आहे; मात्र अधिकारी जुने होते त्यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणू दिले पाहिजे होते. तसेच महापे येथे एमएसआरडीसीचे काम चालू आहे. तेथे वेळीच लक्ष दिले नाही, तर पावसाचे पाणी कंपनीत जाण्याची शक्यता आहे. त्याच प्रमाणे कोपरखैरणे सेक्टर 11 चा नाला अद्याप साफ झाला नाही. जुईनगर येथे नाल्यात मगर असल्याची तक्रार करूनही अद्याप कारवाई का होत नाही. ती मगर नाल्यातून बाहेर आली,तर दुर्देवाने लहान मुलाला गिळू शकेल. त्यामुळे केवळ वन खात्याशी संपर्क केला तिथपर्यंत थांबू नका इतरही पर्याय शोधून ती मगर स्थलांतरित केली पाहिजे. शिवसेनेचे द्वारकानाथ भोईर म्हणाले की, शहरात नाले सफाई झाली आहे; मात्र आणखी परिणामकारक झाली पाहिजे. नाल्यांची खोली वाढविली पाहिजे. दिपाली सकपाळ म्हणाल्या की, कोपरखैरणे येथील नाल्यातील 12 वर्षे गाळ काढला नाही, या नाल्या शेजारी सोसायट्या असून त्यात साप येत आहे. नाला व सोसायटीमधील मोकळी जागी जॉगींग ट्रॅक करा. नाल्या लगत मोङ्गी संरक्षक भिंत बांधावी. देविदास हांडे-पाटील म्हणाले की, नाल्यांमध्ये 8 ते 10 फूट गाळ साचला आहे. शासनाला समुद्रातून मार्ग काढण्याची परवानगी मिळते; परंतु येथे होल्डींग पॉन्ड मधील गाळ काढायला परवानगी मिळत नाही ही दुर्देवी बाब आहे. सभापती शुभांगी पाटील यांनी नालेसफाईची सर्व नगरसेवकांची तक्रार असल्याने येत्या दोन दिवसांत नालेसफाईची पहाणी करणार आहे. नाल्यातून काढलेला गाळ काठावर असून तो वेळी उचलण्यात यावा अन्यथा पावसाने हा गाळ पुन्हा नाल्यात जाणार आहे. तसेच लोकांनी किती नैसर्गिक नाले बुजविले आहेत व कार्यरत किती आहेत याची प्रशासनाने माहिती घ्यावी. वाशी सेक्टर 17 येथील नाल्या लगत परिसर सुंदर केले असतांना त्यावर गाळ टाला हे चांगले नाही,असे त्या म्हणाल्या. या चर्चेला उत्तर देतांना उपायुक्त तुषार पवार म्हणाले की, 25 एप्रिल पासून गटर सफाई सुरू केली होती. यावर्षी आणखी नव्याने 5 गट तयार करण्यात आले होते. 31 मे पर्यंत ती कामे प्रलंबित होती. ती ही आता पूर्ण झाली आहे. गटर सफाईचा गाळ पूर्ण उचलून टाकण्यात आला आहे. नाल्यातील गवत काढणे व पाणी चार महिने प्रवाहित ठेवणे इतकेच काम नाले सफाईत असते. पूर्णपणे गाळ काढणे शक्य नसते. कोपरखैरणे सेक्टर 11 येथील एक नाला महापालिका स्थापन झाल्यापासून कधीच साफ केला नव्हता तेथे काम चालू आहे. वाशी सेक्टर 17 येथील नाल्यातील गाळ फ्लोटर मार्फत काढणे ठराविक किंमतीत शक्य नव्हते. म्हणून हे काम जेसीबीने काम चालू आहे. नाल्या लगत केलेल्या सुशोभिकरणाच्या कामात गाळ टाकला असला, तरी ते सुशोभिकरण पुन्हा करवून घेतले जाणार आहे. हे सुशोभिकरण (गार्डन )सीएसआर निधीतून केले असून ती कंपीन पुन्हा काम करून देणार आहेत. महापालिका यासाठी खर्च करणार नाही. अतिरिक्त आयुक्त रमेश चव्हाण म्हणाले की, नाले साफसफाईच्या निविदा काढून कामे सुरू करण्यास उशीर झाला आहे. शहरातील नाले व गटर 90 टक्के सफाई झाली आहे. ज्या ठिकाणी नाले सफाई झाली नाही तेथे करवून घेऊ असे चव्हाण म्हणाले.