एसएमबीटी हॉस्पिटलचे आरोग्य सेवेत मोठे योगदान- पिचड
संगमनेर, दि. 05 - सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी गोर - गरिबांच्या समृद्ध आरोग्यासाठी सुरु केलेल्या एसएमबीटी हॉस्पीटलने आ. बाळासाहेब थोरात यांचे मार्गदर्शनाखाली सेवाभावीपणे आरोग्य सेवेत मोठे कार्य सुरु केले असल्याचे गौरवोदगार माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी केले आहे.
एकदरा येथे एसएमबीटी सेवाभावी ट्रस्टच्यावतीने सर्वरोगनिदान शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आ.बाळासाहेब थोरात, आ. वैभवराव पिचड, पालघर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनिल भुसार, सौ. हेमलता पिचड, सौ. पूनम पिचड, प्रिया पिचड, दादाभाऊ बागड, डॉ. हर्षल तांबे, श्रीराम कुर्हे, प्रा. डॉ. वनकुटे, बापू भांगरे, भवरी आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचे वाढदिवसानिमीत्त अभिष्टचिंतनही करण्यात आले.
याप्रसंगी मधुकरराव पिचड म्हणाले, आपण कायम सेवाभावीपणे काम केले. मागील 50 वर्षात तालुक्याच्या राजकारणातून विकास केला. कधीही भेदभाव केला नाही.तालुक्याचा एक लौकिक निर्माण केला. मात्र सध्याचे सरकार अतिशय चुकीचे धोरणे राबवत आहे. शिक्षण क्षेत्र गरिबांच्या विकासाचे साधन आहे. मात्र चुकीचे धोरणे राबवून हे सरकार एक पिढी बरबाद करु पाहत आहे. आपण असे होवू देणार नाही. यासाठी संघर्ष करु. आ. थोरात , आ.वैभवराव पिचड हे कायम जनतेच्या विकासासाठी कटीबद्ध आहेत. एसएमबीटी हॉस्पीटलने कायम आदिवासी, गोर - गरिबांसाठी आरोग्याच्या सुविधा सुरु केल्या आहेत. गोर गरिबासांठी अनेक सुविधा मोफत पुरविल्या आहे. अकोला व नगर जिल्ह्यासाठी हे हॉस्पीटल मोठी उपलब्धी ठरली असल्याचेही ते म्हणाले.
आ. थोरात म्हणाले, माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचे 50 वर्षाचे समाजविकासाचे कार्य सदैव प्रेरणादायी ठरणारे आहे. राज्यात नव्हे तर देशाला ते विचार देणारे नेते आहेत. त्यांचे कामातील सातत्य, उत्साह व नियमीतपणा हा इतरांना दिशादर्शक आहे. मधुकरराव पिचड यांनी आदिवासी अकोले तालुका ते विकसीत अकोले तालुका अशी ओळख निर्माण करुन दिली. अकोले तालुका व संगमनेर तालुक्याचा कायम चांगला ऋणानुबंध राहिला. स्वातंत्र्य लढाईच्या काळात या भागाने भूमीगत स्वातंत्र्यसैनिकांना अन्न व बळ दिले. डॉ. आण्णासाहेब शिंदे, अॅड. रावसाहेब शिंदे, तिर्थरुप स्व. भाऊसाहेब थोरात यांना मोठी मदत केली. 1983 मध्ये 61 निमीत्त सुरु केलेले एसएमबीटी सेवाभावी ट्रस्टचे आज वटवृक्षात रुपांतर झाले असून नागरिकांना अनेक मोफत सुविधा पुरविल्या जात आहे. जनतेने या सुविधांचा लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
आ. वैभवराव पिचड म्हणाले, मधुकरराव पिचड यांनी सातत्याने विकासाचा ध्यास ठेवला. गावोगावी रस्ते, पाणी, शाळा, वीज, सिमेंट बंधारे अशी विकास कामे केली. या भागातील नागरिकांशी धरणांची निर्मीती केली. आज आरोग्य शिबीरातून गोर - गरिबांना मोठा लाभ होणार असल्याचेही ते म्हणाले.
या प्रास्ताविक दशरथ वर्पे यांनी केले. सुत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर दत्ता जाधव यांनी आभार मानले. यावेळी पंचक्रोशीतील नागरिक, महिला, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.