Breaking News

जम्मू -काश्मीरमध्ये भूकंपाचे धक्के; जीवितहानी नाही

नवी दिल्ली, 10 जून,  : जम्मू - काश्मीरमध्ये आज पहाटे 3 वाजून 49 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 3.2 ऱिश्टर स्केल एवढीहोती.  भूकंपाचे धक्के सौम्य असल्यामुळे यात कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही. या भूकंपाचे केंद्र कुठे होते याबाबत माहिती मिळालेली नाही.
मागील दोन आठवड्यात आलेला हा तिसरा भूकंप आहे. यापूर्वी दिल्ली राजधानी क्षेत्रात आणि पुण्यात भूकंपाचे धक्के जाण
वले होते. 3 जून रोजी पुण्यात 4.8 रिश्टर  स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले होते. याचे केंद्र कोयना धरण असल्याचे सांगण्यात येत होते. तर दिल्ली राजधानी क्षेत्रात 4.7 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला  होता.