Breaking News

इराणकडून 25 भारतीय मच्छीमारांची सुटका, सुषमा स्वराज यांची माहिती

नवी दिल्ली, दि. 10 - इराणने पकडलेल्या 25 भारतीय मच्छिमारांची सुटका केल्याची माहिती परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी दिली आहे. या मच्छिमारांना  बहरीना येथे नौकांसह अटक करण्यात आली होती.
तामिळनाडूच्या 25 मच्छिमारांना इराणकडून सोडण्यात आल्याची माहिती देतांना मला अत्यनंद होत आहे. या मच्छिमारांना परत भारतात पाठविण्यात येत आहे.  इराणच्या कोस्ट गार्डने मार्चमध्ये पाच भातीय मच्छिमारांना अटक केली होती, असे स्वराज यांनी ट्वीटरच्या माध्यमातून सांगितले.स्वराज यांनी या प्रकरणी  तेहरानमधील भारतीय दुतावासाचे आभार मानले आहेत.