Breaking News

ऑस्ट्रेलियाच्या लॅनिंगने कोहली, अमलालाही टाकले मागे

लंडन, दि. 01 - ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाची कर्णधार मेग लॅनिंग हिने एक नवा विक्रम रचला आहे. पुरूष आणि महिला या दोन्ही प्रकारात मिळून सर्वात  जलद 11 एकदिवसीय शतके झळकवण्याचा विक्रम तिने केला आहे. लॅनिंगने या बाबतीत भारताचा कर्णधार विराट कोहली आणि द. आफ्रिकेचे सलामीवीर हशिम  अमला आणि क्विंटन डी कॉक यांनादेखील मागे टाकले आहे. लॅनिंगने श्रीलंकेविरूद्धच्या विश्‍वचषक 2017च्या सामन्यात 11 वे शतक झळकावले. हा तिचा केवळ  59वा सामना होता. त्या तुलनेत अमलाने 11 शतके झळकावण्यासाठी 64, डी कॉकने 65 तर कोहलीने 82 सामने खेळले होते.