Breaking News

भारत अ, युवा संघाच्या प्रशिक्षकपदासाठी द्रविडला दोन वर्षांची मुदतवाढ

नवी दिल्ली, दि. 01 - भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड याला भारत अ आणि युवा संघाच्या प्रशिसाठी दोन वर्षांची मुदत वाढ देण्यात आली आहे. भारतीय  क्रिकेट नियामक मंडळाने ही महिती दिली आहे. द्रविडचा या पदासाठी झालेला आधीचा करार लवकरच संपुष्टातयेणार होता. मात्र या पदासाठी मंडळाने कोणाकडूनही  अर्ज मागवलके नव्हते. त्यामुळे द्रविडला मुदतवाढ मिळणार हे जवळपास निश्‍चित होते. आज याबाबतची घोषणा करण्यात आली.
दरम्यान, नुकताच आफ्रिका दौ-यासाठी भारत अ संघ जाहीर करण्यात आला. हा दौरा 26 जुलैपासून सुरू होत आहे. तर भारताचा युवा संघ जुलै महिन्यात इंग्लंड  दौ-यावर आहे. त्यामुळे द्रविड यापैकी कोणत्या संघाबरोबर राहणे पसंत करतो, हे पाहणे महत्वाचे ठरेल.