Breaking News

दुबईत लवकरच रंगणार ‘मिनी आयपीएल’?

नवी दिल्ली, दि. 01 - इंडियन प्रिमियर लीग म्हणजेच आयपीएलच्या यशानंतर आता मिनी आयपीएल म्हणजेच छोटेखानी आयपीएल स्पर्धांचे आयोजन भारतीय  क्रिकेट नियामक मंडळाकडून करण्यात येण्याची शक्यता आहे. मंडळाचे वरिष्ठ अधिकारी राजीव शुक्ला यांनी याबाबत वक्तव्य केले आहे. आयपीएलचा थरार आणि  त्याची लोकप्रियता ही विदेशी खेळाडूंबरोबरच तेथील जनतेलाही भावली आहे. मंडळातर्फे ‘चॅम्पियन्स लीग टी20’ स्पर्धा विदेशात खेळवल्या जातात. त्या जागी ‘मिनी  आयपीएल’चे आयोजन करण्याचा विचार भारतीय क्रिकेट नियामक मंडळ करत आहे, असे शुक्ला यांनी सांगितले. या स्पर्धेचे आयोजन दुबईत केले जाणार असल्याची  दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.