Breaking News

लक्ष्यभेदी हल्ल्यामुळे भारताचे सामर्थ्य जगापुढे आले - पंतप्रधान मोदी

व्हर्जिनिया, दि. 27 - आम्ही स्वत:चे संरक्षण करु शकतो हे लक्ष्यभेदी हल्ल्यामुळे जगाला समजले आणि त्यामुळे भारताचे सामर्थ्य जगापुढे आले, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे केले. ते व्हर्जिनिया येथे अमेरिकेतील भारतीयांना संबोधित करत होते. 
दहशतवादाला प्रत्युत्तर देताना भारतीय लष्कराने लक्ष्यभेदी हल्ला केला त्यावेळी भारताची लष्करी ताकद जगाला पटली. आम्ही केलेल्या लक्ष्यभेदी हल्ल्याबाबत कोणत्याही देशाने प्रश्‍न उपस्थित केले नाहीत. केवळ ज्या देशांना ते सहन करावे लागले त्यांनीच याबाबत शंका उपस्थित केली, असे मोदी म्हणाले.
भारताला दहशतवादाची झळ पूर्वीपासूनच लागली होती मात्र, पण जगाला ते पटले नव्हते. मात्र, आता संपूर्ण जगभरात दहशतवादी कारवायां होऊ लागल्याने जगाला दहशतवाद काय असतो हे कळून चुकले आहे, असेही मोदी यांनी नमूद केले.
लक्ष्यभेदी हल्ल्यात केवळ दहशतवाद्यांना लक्ष्य करण्यात आले होते. यावरून भारत हा शांतप्रिय देश आहे हे स्पष्ट होते. पण असे असले तरी, भारताच्या सहनशक्तीला भारतीयांचा दुबळेपणा समजण्याची चुक करू नये, हा संदेश मोदी यांनी दिला.