Breaking News

कारवार नौदल तळावर तीन संशयितांना अटक, अतिदक्षतेचा इशारा

नवी दिल्ली, दि. 23 - कर्नाटकातील कारवार येथील नौदल तळावर तीन संशयित नागरिकांना अटक केल्यानंतर येथे अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.  कारवार जवळ अत्याधुनिक नौदल तळ प्रकल्प आहे. 21 जून रोजी या तळाच्या परिसरात संशयित व्यक्ती दिसून आल्याची माहिती मिळाल्यानंतर शोधमोहिम सुरु  करण्यात आली होती.
तळावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍याच्या मदतीने तीन संशयित व्यक्तींना पकडण्यात आले. हे तिघे राष्ट्रीय महामार्ग 66 वरील भिंतीवरुन घुसखोरीचा प्रयत्न  करत होते. गेल्या 10 दिवसांमध्ये येथे घुसखोरी करण्याची ही दुसरी घटना आहे. या परिसरात स्थानिक रहिवासी चेंदिया आणि हट्टीकेरीमधील जंगलात लाकडे  तोडण्यासाठी आणि समुद्रामध्ये मासेमारी करण्यासाठी येतात.