Breaking News

ऑपरेशन प्रहार अंतर्गत सुकमा नक्षलवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार हिडमा जखमी

सुकमा, दि. 30 - छत्तीसगढ पोलीस व केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या संयुक्त अभियानात सुकमा हल्ल्यातील मुख्य नक्षलवादी हिडमा जखमी झाला आहे. ऑपरेशन  प्रहार अंतर्गत केलेल्या कारवाईत हिडमाला गोळी लागली आहे, अशी माहिती सुकमाचे पोलीस अधिक्षक अभिषेक मीणा यांनी दिली. हिडमाला गोळी लागल्याच्या  घटनेला तोंदामार्का गावातील ग्रामस्थांनी दुजोरा दिला आहे. याशिवाय नक्षलवादी 10 जणांचा मृतदेह तोंदामार्कामधील सकलेर परिसरात घेऊन गेले असल्याचे मीणा  यांनी सांगितले.