Breaking News

उ.प्र.मध्ये 29 लाखांच्या जुन्या नोटांसहित पाच जण अटकेत

मेरठ, दि. 30 - उत्तर प्रदेशमधील मेरठ जिल्ह्यात पोलिसांनी 29 लाख रुपयांच्या नोटांसहित पाच जणांना अटक केली आहे. या नोटांमध्ये 500 आणि 1 हजार  रुपयांच्या जुन्या नोटांचा समावेश आहे. बुधवारी रात्री उशिराही गाड्यांची तपासणी करण्यात येत होती. त्यावेळी ही कारवाई करण्यात आली असल्याचे पोलीस  अधिकारी बृजेश कुमार सिंग यांनी सांगितले.
या जुन्या नोटा कुठून आल्या आणि त्या कुठे पोहोचवल्या जात होत्या. याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. शक्ति सिंग, कृष्णपाल, दीपचंद, मदनलाल आणि  ममता अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पोलिसांबरोबरच आयकर विभागाचे अधिकारीही आरोपींकडे चौकशी करत आहेत.