Breaking News

सत्तरीच्या वरच्या व्यक्ती ’बीसीसीआय’चे पदाधिकारी म्हणून का काम करू शकत नाहीत; निरंजन शहा यांचा सवाल

नवी दिल्ली, दि. 30 - आपल्या देशाला सत्तरीच्या वरच्या व्यक्ती ’बीसीसीआय’चे पदाधिकारी म्हणून का काम करू शकत नाहीत, असा सवाल सौराष्ट्र क्रिकेट  संघटनेचे माजी अध्यक्ष आणि मंडळाचे माजी सदस्य निरंजन शहा यांनी उपस्थित केला आहे. लोढा समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्याबाबत तयार  करण्यात आलेल्या मंडलाचया विशेष समितीत त्यांना समाविष्ट करण्यात आले. त्यानंतर त्यांनी हा सवाल उपस्थित केला.
जर भारताचे विद्यमान राष्ट्रपती प्रणब मुखर्जी वयाच्या 81 व्या वर्षीदेखील त्यांचा पदभार समर्थपणे सांभाळू शकतात, तर मग भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या  आणि राज्य क्रिकेट संघटनांच्या बाबतीतच हा भेदभाव का? एखादा माणूस जो पर्यंत पूर्ण तंदुरुस्त आहे, तोपर्यंत त्याला काम करू द्यायला हवे, असे शहा म्हणाले.
शहा यांचे वय 73 वर्षे असून लोढा समितीच्या शिफारशींनुसार शहा यांना काही महिन्यांपूर्वी पदावरून दूर करण्यात आले आहे.