Breaking News

मणिपुरमधील बॉम्ब स्फोटात आसामच्या पोलीस दलातील जवान शहीद

नवी दिल्ली, दि. 01 - आज सकाळी मणिपुरमध्ये झालेल्या बॉम्ब स्फोट आसामच्या पोलीस दलातील एक जवान शहीद झाला आहे. नुकत्याच झालेल्या हल्ल्यानंतर  छत्तीसगडमधील सुकमा येथे सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी नक्षलवाद्यांविरोधात मोहीम सुरू केली आहे.
या मोहिमेला ऑपरेशन प्रहार असे नाव देण्यात आले आहे. याअंतर्गत जवानांनी केलेल्या कारवाईत 20 पेक्षा अधिक नक्षलवादी ठार झाले आहेत. तर 8 ते 10  नक्षलवादी जखमी झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. या मोहिमेदरम्यान तीन जवानही शहीद झाले आहेत. तर, 5 जवान जखमी झाले आहेत.