Breaking News

वस्त्र ही भारतीय संस्कृतीच्या विविधतेची ओळख - पंतप्रधान मोदी

अहमदाबाद, दि. 01 - वस्त्र ही भारतीय संस्कृतीच्या विविधतेची ओळख आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांनी आज येथे केले. देशातील अनेक भाग  कापड उद्योग नगरी या नावाने ओळखले जातात असेही पंतप्रधान म्हणाले. ते आंतरराष्ट्रीय वस्त्रोद्योग परिषदेत बोलत होते. या परिषदेत 100 देशांच्या प्रतिनिधींसह  आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू उपस्थित होते.
देशातील आतापर्यंतचा हा सर्वांत मोठा कार्यक्रम आहे. पहिल्यांदाच केंद्र व राज्य सरकारांसह वस्त्रोद्योग क्षेत्राशी संबंधितांनी संपूर्ण जगात या क्षेत्राला एका नव्या उंचीवर  नेऊन ठेवले आहे. हे क्षेत्र सर्व प्रकारच्या व्यवसायांचा आधार आहे. भारताने कापड उद्योगात परदेशी गुंतवणुकीचे धोरण अवलंबले आहे. हे क्षेत्र कृषी व उद्योग यांच्या  दरम्यान एका दुव्याचे काम करत आहे. याचा उद्देश अधिकाधिक रोजगार मिळवून देणे हा आहे. सध्या हा देशातील दुस-या क्रमांकाचे रोजगार देणारे क्षेत्र आहे, असेही  पंतप्रधान म्हणाले.