Breaking News

ज्येष्ठ विधिज्ञ के.के वेणूगोपाल यांची महाधिवक्तापदी नियुक्ती

नवी दिल्ली, दि. 01 - ज्येष्ठ विधिज्ञ के.के वेणूगोपाल यांची भारताच्या महाधिवक्तापदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाधिवक्तापदी मुकुल रोहतगी यांच्या जागी  वेणूगोपाल यांची नियुक्ती करण्यात आली. वेणूगोपाल यांच्या नियुक्तीसाठी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी हिरवा कंदील दाखवला. येत्या दोन दिवसांत केंद्र सरकारकडून  याबाबत अधिकृत घोषणा केली जाणार असल्याचे समजते. मोरारजी देसाई सरकारच्या काळात वेणूगोपाल अतिरिक्त सॉलिसिटर जनरल पदावर कार्यरत होते.  वेणूगोपाल यांना पद्म विभूषण पुरस्कारनेही सन्मानित करण्यात आले आहे.