विज्ञान,तंत्रज्ञानाच्या युगात माणुसकीची गरजःआ.जगताप
। जय मल्हार संस्थेच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राज्यस्तरीय पुरस्काराचे वितरण
अहमदनगर, दि. 07 - विज्ञान, तंत्रज्ञानाच्या युगात माणुसकीची गरज आहे. धावपळीच्या जीवनात स्वार्थापोटी मनुष्यची माणुसकी दुर्मिळ होताना दिसत आहे. अशा समाजरचनेत सामाजिक संस्था समतोल साधण्याचे काम करत असतात. जिल्ह्याला सामाजिक कार्याचा मोठा वारसा लाभला असून, समाजाला चांगली दिशा देण्याचे कार्य सामाजिक कार्यकर्ते व संस्था करत आहे. काम छोटे असले तरी त्यामागची भावना मोठी असली पाहिजे. अशा सामाजिक कार्याचे मुल्यमापण होवून, त्यांना पुरस्काररुपाने पाठीवर प्रोत्साहनची थाप आवश्यक असल्याची भावना आ.संग्राम जगताप यांनी व्यक्त केली.जय मल्हार शैक्षणिक व बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने सावेडी येथील माऊली सभागृहात आयोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त राज्यस्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी आ.जगताप बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोल्हापुरचे उद्योजक जतनसिंह मेहता उपस्थित होते. यावेळी राजेंद्र तागड, श्री वीर, जिल्हा महिला बालविकास अधिकारी विजयामाला माने, गणेश रहिकवार, श्रीकांत चेमटे, पै.नाना डोंगरे, रमेश गावडे, सुभाष जाडकर, मिना आढाव, सतिष लालबिगे, दशरथ मानवतकर, इंदुमती सावंत, संस्थेचे अध्यक्ष कांतीलाल जाडकर, विद्या तनवर, जगन्नाथ माने आदि प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपिठावर उपस्थित होते.