गटविकास अधिका-याच्या दालनास लावले कुलूप
जालना, दि. 22 - घनसावंगी पंचायत समितीच्या निष्क्रीय कारभाराच्या निषेधार्थ शिवसेनेचे सदस्य अनिरुद्ध शिंदे, पुरुषोत्तम उढाण, रमेश बोबड यांनी आज गटविकास अधिका-याच्या दालनास कुलूप लावले. पंचायत समितीकडून अनेक कामे आणि शासनाकडून आलेल्या योजना राबविण्याचे काम होत नव्हते वारंवार तक्रारी करूनही कामे होत नसल्याने आज चिडलेल्या शिवसैनिकांनी चक्क गटविकास अधिका-याच्या दालनास कुलूप लावले.