Breaking News

रोपे आपल्या दारी; आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन

पुणे, दि. 30 - पिंपरी चिंचवड महापालिकेच्या रोपवाटीका विभागाच्या वतीने ’रोपे आपल्या दारी’ हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. भाजप शहराध्यक्ष तथा  आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी महापौर नितीन काळजे, उपमहापौर शैलजा मोरे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार,  नगरसेवक तुषार हिंगे, पुणे जिल्ह्याचे उपवनसंरक्षक रंगनाथ नाईकडे, रमाकांत कुलकर्णी, प्राधिकरण येथील ज्येष्ठ नागरीक संघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित  होते.
या उपक्रमाविषयी अधिक माहिती देताना पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले, या योजनेअंतर्गत वनविभागाच्या वनक्षेत्राच्या हद्दीतील नागरिकांना एका फोनकॉलवर रोपे  घरपोच मिळणार आहेत. या रोपाची किंमत अल्प प्रमाणात ठेवण्यात आली आहे. काठसादर, चिंच, आवळा, सीताफळ, जांभुळ, कवट, बेहडा, खैर, काशिद, शिरस,  ऑस्ट्रेलियन बाभूळ, करंजी, चारोळी यांचे रोपेही मिळणार आहेत. शासनाच्या वृक्ष लागवड मोहिमेला यशस्वी करण्यासाठी हातभार लावावा आणि पर्यावरणाचे रक्षण  करावे, असे आवाहन एकनाथ पवार यांनी केले.