Breaking News

’साई इंजिनिअरिंग’ कॉलेजचे संलग्नीकरण रद्द करण्याचा निर्णय

औरंगाबाद, दि. 23 - सामूहिक कॉपीप्रकरणी साई इंजिनीअरिंग कॉलेजची प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया थांबवण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर डॉ. बाबासाहेब  आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात बुधवारी (21 जून) झालेल्या विद्या परिषदेच्या बैठकीत महाविद्यालयाचे संलग्नीकरण रद्द करण्यात आले असल्याची माहिती कुलगुरू  डॉ. बी. ए. चोपडे यांनी दिली. विद्या परिषदेच्या मंगळवार आणि बुधवारी झालेल्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. बैठकीबाबत कुलगुरू डॉ. चोपडे  म्हणाले की, साई इंजिनीअरिंग कॉलेजच्या संलग्नीकरण रद्द करण्याचा निर्णय विद्यापरिषदेच्या बैठकीत घेण्यात आला असून, यासंदर्भात तंत्रशिक्षण विभागाला प्रस्ताव  पाठवण्यात आला आहे. येत्या 27 जून रोजी होणार्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीमध्ये या प्रस्तावाला मान्यता मिळेल.