Breaking News

वागळे विभागातील वाहतूक समस्येचे निराकरण तातडीने करा - महापौर मिनाक्षी शिंदे

ठाणे, दि. 23 - वागळे इस्टेट विभागात होत असलेली वाहतूक कोंडी सोडविण्याबाबत आवश्यक ती उपाययोजना करावी, यासाठी आज महापौर मिनाक्षी शिंदे यांनी  संबंधित अधिका-यांसमवेत पाहणी दौरा केला. या ठिकाणी होत असलेल्या वाहतूक कोंडीबाबत रस्ता रुंदीकरण करणे, आवश्यक त्या ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू  करणे आदी निर्णय तातडीने घेवून वागळे विभागातील वाहतूक कोंडीची समस्या लवकरात लवकर सोडविण्याचे आदेश महापौर मिनाक्षी शिंदे यांनी प्रशासनाला दिले  आहेत.
वागळे विभागात होत असलेल्या वाहतूककोंडीबाबत विभागातील स्थानिक लोकप्रतिनिधींनी मागणी केली होती. या अनुषंगाने महापौर अध्यक्षतेखाली दिनांक 16 जून  2017 रोजी महापौर दालनात बैठक झाली होती. या बैठकीत प्रत्यक्ष जागेवर जावून निर्णय घेण्याचे ठरविण्यात आले होते त्यानुसार आज या विभागाची पाहणी दौरा  आयोजित करण्यात आला. यावेळी सभागृहनेते नरेश म्हस्के, गटनेते दिलीप बारटक्के, माजी गटनेते संतोष वडवले, नगरसेवक एकनाथ भोईर, पुर्वेश सरनाईक,  नगरसेविका एकता भोईर, कांचन चिंदरकर, आशा डोंगरे, प्रशासनाच्यावतीने उपायुक्त संजय हेरवाडे, अशोक बुरपल्ले, नगरअभियंता रतन अवसरमल, पोलीस निरीक्षक  एस.डी. गोसावी, कार्यकारी अभियंता प्रकाश खडतरे, संजय शिंदे, स्वच्छता निरीक्षक पटनाईक, परिवहन सेवेचे धात्रप, दिवाडकर, उपअभियंता रोकडे, महादेव पवार,  शैलेश चारी आदी उपस्थित होते.