’देशातील प्रत्येक घरात एलपीजी गॅस पोहोचवणार’
औरंगाबाद, दि. 07 - देशातल्या प्रत्येक घरात एलपीजी गॅस पोहोचवून चुलीच्या धुरापासून महिलांचे आरोग्य वाचविण्याचा संकल्प केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी व्यक्त केला,उज्वला गॅस योजने अंतर्गत गॅस शहरातील गरजू महिलांना काल शासनातर्फे गॅस वाटण्यात आले तर गॅस सबसीडी सोडलेल्या काही नागरिकांचा पंत्रधानांचे पत्र देंवून प्रधान यांच्या हस्ते सत्कार करण्यातआला.शासनाने तीन वर्षात गॅस घरोघरी पोहोचवला,लोंकांना बॅक खाते उघडायला लावले शौचालये बांधून खेडयातील महिलांची कोंडी सोडवली.देशभरात वेगवेगळ्या शहरांत आणि जिल्ह्यांत पेट्रोल-डिझेलचे भाव समान नाहीत. ते समान ठेवण्याचाविचार सरकार करत आहे, असे ते म्हणालो. औरंगाबाद शहरात इंधनडेपो सुरू करण्याचाही विचार; तसेच कोकणामध्ये 60 दशलक्ष टन क्षमतेचा तेल शुद्धीकरणाचा कारखाना राज्य सरकारशी सल्लामसलत केल्यानंतर उभारण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी केली.