भारत पाकिस्तानला पराभूत करेल : व्ही व्ही एस लक्ष्मण
बंगळुरू, दि. 01 - चॅम्पियन्स करंडक स्पर्धेतील सामन्यात भारत पाकिस्तानला नक्की पराभूत करेल, असा विश्वास भारताचा माजी फलंदाज व्ही व्ही एस लक्ष्मण याने व्यक्त केला आहे. भारत पाकिस्तानला तर नमवेलच, पण पुन्हा एकदा करंडकही आपल्या नावे करेल, असेही लक्ष्मण म्हणाला.
भारताची दोन सराव सामन्यातील कामगिरी उत्कृष्ट आहे. शिखर धवनला सूर सापडला आहे. दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, केदार जाधव आणि जडेजाही यांनीही चांगली फलंदाजी करून दाखवली आहे. गोलंदाजीतही मोठी सुधारणा झाली असून गोलंदाज धावा वाचवण्यापेक्षा बळी टिपण्याचा प्रयत्न करत आहेत. ही आक्रमक वृत्ती संघाला समर्पक आहे, असे लक्ष्मणने सांगितले.
पाकिस्तानविरूद्धचा सामना निश्चितच उत्कंठावर्धक आणि रोमांचक होईल. बर्मिंगहमचे स्टेडियम हाऊसफुल असेल यातही शंका नाही. पण सध्या भारतीय संघाची कामगिरी पाहता हा सामना भारतच जिंकेल, असा विश्वासही लक्ष्मणने व्यक्त केला.