महिला पत्रकाराशी अश्लील वर्तन केल्यामुळे फ्रान्सच्या टेनिसपटूवर बंदी
पॅरिस, दि. 01 - मुलाखतीदरम्यान महिला पत्रकाराशी अश्लील वर्तन केल्याबद्दल फ्रान्सचा टेनिसपटू मॅक्सिम हमाऊ याच्यावर बंदी उर्वरित स्पर्धेसाठी बंदी घालण्यात आली आहे. हमाऊला फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत ’वाईल्डकार्ड’ प्रवेश मिळाला होता. मात्र पहिल्याच फेरीत उरूग्वेच्या पॅब्लो क्युवेस याच्याकडून तो पराभूत झाला. पराभवानंतर मैदानाबाहेर महिला पत्रकार मॅली थॉमस हिला मुलाखत देताना त्याने तिच्याशी अश्लील वर्तन केले. हा मुलाखतीचे थेट प्रक्षेपण दूरचित्रवाणीवर सुरू होते. हा प्रकार पाहून स्टुडिओमध्ये बसलेले लोक हसू लागले. पण फ्रेंच टेनिस संघटनेने घटनेचे गांभीर्य लक्षात घेउन हमाउवर त्वरित बंदी घातली.