Breaking News

एनएमएमटी कर्मचार्‍यांना मारहाण करणार्‍या रिक्षा चालकांना अटक


नवीमुंबई,दि.11 : एनएमएमटी कर्मचर्यांना मारहाण करणार्‍या 2 रिक्षा चालकांना कोपरखैरणे पोलिसांनी अटक केली आहे. नवी मुंबईतील घणसोली नोडमध्ये ही घटना काल घडली. राजेश मारूती वाशीवाले आणि दादासो घुडेकर या दोन रिक्षाल्यांना अटक करण्यात आली असून एक जण फरार आहे.
काल संध्याकाळी घणसोली सेक्टर 5 मध्ये हावरे चौकात रस्त्यावर रिक्षा उभ्या केल्या असल्याने बस जाण्यास अडचण निर्माण झाली होती. यामुळे एनएमएमटी बसचालका फयाज पठाण यांनी हॉर्न वाजवून रिक्षा बाजूला घेण्यास सांगितले. याचा राग येऊन 3 रिक्षा चालकांनी बस चालक व वाहक यांना बस मधून खाली उतरवून बेदम मारहाण करण्यास सुरवात केली. आरोपींनी बस चालकयांच्या कानशिलात लावत विट फेकून मारली आहे. त्याच बरोबर सायकल उचलून डोक्यात घातली आहे. सर्व प्रकार मोबाईल मध्ये कैद झाला आहे. कोपरखैरणे पोलीस ठाण्यात तीन रिक्षा चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक केली आहे.