Breaking News

वादळ वार्‍यासह पावसात नांदेड जिल्ह्यात तिघांचा मृत्यू


नांदेड,दि.11 : शहरासह जिल्ह्यात सायंकाळी अचानक विजांच्या कडकडाटात झालेल्या पावसात वीज पडून हिमायतनगर तालुक्यातील मौजे पिछोन्डी येथील एका 52 वर्षीय शेतकर्‍याचा तर देगलूर तालुक्यात दोन शेतकर्‍याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अचानक तुफान वादळी वारे आले. तसेच वीजांचा कडकडाटा बरोबर पावसाचे आगमनाही झाले.
हिमायतनगर शहरासह तालुक्यातील कार्ला, पिछोन्डी, सवना, सरसम, टेभी, खडकी सहअनेक ग्रामीण भागात वादळी वार्‍याने लहान घराच्या छतावरील पत्रे उडुन गेली, तसेच अनेक झाडे जमीनदोत झाली. वादळी वार्‍याच्या झटक्याने अनेक ठिकाणी महावितरणची तारे तुटून पडल्याने ग्रामीण भागातील बहुतांश
गावे अंधारात आली आहेत. दरम्यान तालुक्यातील मौजे पिछोन्डी - कारला येथिल शेतकरी विठ्ठल यादोजी मिराशे हे खरिपाच्या पेरणीपूर्व कामासाठी वडगाव शिवारात असलेल्या शेतात गेले होते. दिवसभर वखर पाळी करून घराकडे परत येत असताना अचानक विजेच्या कडकडाटसह पाऊस झाला. भिजण्यापासून बचाव करण्यासाठी लिंबाच्या झाडाचा दोन बैलसह आसरा घेतला होता. याचा दरम्यान जोराची वीज कडाडली आणि थेट लिंबाच्या झाडावर पडल्याने येथे उभे असलेले शेतकरी विठ्ठल यांचा जागीच मृत्यू झाला. तर दोन बैल बालबाल बजावले असल्याची माहीती ऊपसरपंच पाटील कैलास डुडुळे यांनी दिली. हिमायतनगर ग्रामीण रुग्णालयात मयत शेतक-यांचे प्रेत आणण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. सदरील शेतकर्‍यांच्या पश्‍चात पत्नी, तीन मुले, पाच मुली, भाऊ असा परिवार आहे. अचानक घडलेल्या घटनेबद्दल कारला पिच्छोडीसह परिसरात गावकर्‍यातून हळहळ व्यक्त होत आहे.देगलूर तालुक्यातील रमतापूर येथील गोपाळ पांढरी पाटील वय 32आणि ज्ञानेश्‍वर शंकर पाटील वय 17 हे दोघे शेतातील गोठ्याच्या आश्रयाला थांबले होते. त्यावेळी अचानक विजांचा कडकडाट होऊन वीज कोसळली यात वरील दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.हिमायतनगर परिसरात आज मृग नक्षञाच्या संध्येला सायंकाळी झालेल्या वादळी वार्यासह विजेच्या कडकडाट झाला. दरम्यान सिरंजणी शेत-शिवारात शंकर तिमापुरे यांच्या शेतात जांभुळाच्या झाडाखाली बाधलेल्या गाय आणी वासरू यांच्या अंगावर विज पडल्याने जागीच ठार झाले. यामुळे शेतकरयांचे
जवळपास 50 हजारांचे नुकसान झाले आहे. या घटनांची दखल घेऊन महसूल विभागाने पंचनामे करून शेतकर्यांना मदतीचा हातभार लावावा अशी मागणी होत आहे.