आदिवासी स्वशासन व वनहक्क कायद्याबाबत जनजागृती
अकोले, दि. 05 - अकोले तालुक्यातील अनुसूचित क्षेत्रातील, मौजे खडकी, वाघदरी, कोथळा, रतनवाडी व मुतखेल या गावांमध्ये नुकताच लोकपंचायत जाणीव जागृती कला मंच संचालित चाळीसगाव डांगण आदिवासी कला पथकाचा जनजागृती कार्यक्रमाचा दौरा संपन्न झाला.
लोकरंजनातून लोकप्रबोधन करत हा कार्यक्रम लोकांना खुपच भावला या कार्यक्रमात विविध नाट्यप्रसंग टाकण्यात आले होते.
प्रसंग 1 - ‘गावकरी-पेसा म्हणजे पैसा का? कार्यकर्ता - नाही, पेसा म्हणजे पंचायत विस्तार कायदा म्हणजेच आदिवासी स्वशासन कायदा गावकरी. या कायद्याचे महत्व काय? कार्यकर्ता - या कायद्याने आदिवासी संस्कृती परंपरा यांना मान्यता दिली आहे. या कायद्यानुसार देशाची जशी लोकसभा तशी गावाची ग्रामसभा आहे. गावकरी- आमचा जंगलावर काहीच हक्क नाही का? कार्यकर्ता- वन अधिकार कायदा 2006 नुसार आपले वैयक्तिक सामुदायिक दावे करून आपल्या हक्कांना मान्यता देता येणार आहे. आपल्याला जंगलाचे जतन व संवर्धन व वनउपज विक्रीचा अधिकार मिळणार आहे.’ अशा प्रकारे अनेक नाट्य प्रसंग, गाणे संवादातून हा कार्यक्रम आदिवासी स्व-शासन कायदा वनाधिकार कायद्याबद्दलची माहिती देत प्रबोधन मनोरंजन करत लोकांमध्ये जागृती निर्माण करत आहे. कार्यक्रमा नंतर प्रश्नोत्तराच्या माध्यमातून ग्रामस्थांनी कायदा समजून घेण्याचा प्रयत्न केला.
लोकपंचायत या भागात विविध उपक्रमाच्या माध्यमातून लोकांचे प्रबोधन करत आहेत. लोकपंचायतच्या विशेष प्रयत्नातून सात गावांचे सामुहिक वन हक्क दावे शासनाकडे दाखल करण्यात आले आहे. तसेच पेसा कायद्यानुसार गावाचा कारभार चालवावा यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहे. या कार्यक्रमात लोकपंचायतचे कला मंच प्रमुख शाहीर प्रा. तुळशीराम जाधव विश्वस्त सारंग पांडे, हनुमंत उबाळे, त्रिंबक धराडे, साहेबराव भारमल, नारायण सावंत्र, वाळीबा भौरुले, बजरंग जडगुले, रामदास शिंदे, नंदा बांडे, सरिता सावंत, विजया पाडेकर, किशोर सोनवणे, आदि कार्यकर्ते या कार्यक्रमात सहभागी झाले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी भाऊराव उघडे, कृष्णा भांगरे, ओंकार बांडे यांनी विशेष प्रयत्न केले. आपल्या गावातील सर्वांनी एकत्र येऊन सामुहिक वन हक्काचा दावा दाखल करण्याचे आवाहन हनुमंत उबाळे यांनी केले.