Breaking News

अभिनवला आदर्श शिक्षण संस्था पुरस्कार


अकोले, दि. 05 - महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने प्रतिवर्षी महाराष्ट्रातील नऊ संस्थांना अथवा व्यक्तींना नवरत्न पुरस्कार प्रदान करण्यात येतो. यावर्षीचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षण संस्था पुरस्कार 2017 अकोले तालुक्यातील उपक्रमशील अभिनव शिक्षण संस्थेला प्रदान करण्यात आला.
साईबाबा विश्‍वस्थ व्यवस्थेचे उपाध्यक्ष माजी आ. चंद्रशेखर कदम, भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई, माजी. खा. भाऊसाहेब वाकचौरे यांच्या हस्ते तसेच महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्य अध्यक्ष विलासराव कोळेकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने नुकताच शिर्डी येथील साई संस्थांच्या कार्यालयात हा विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार संस्थेचे अध्यक्ष मधुकरराव नवले, कोषाध्यक्ष भाऊसाहेब नाईकवाडी यांनी स्वीकारला. यावेळी पत्रकार संघाच्या राज्यभरातील पदाधिकार्‍यांची उपस्थिती लक्षणीय होती. पत्रकार संघाकडून अभिनव शिक्षण संस्थेच्या कार्याचा विशेष गौरव करण्यात आला व प्रत्येकाने एकदा तरी अभिनवला भेट द्यावी असे आवाहन देखील करण्यात आले. यावेळी सत्काराला उत्तर देताना संस्थेचे अध्यक्ष मधुकरराव नवले यांनी महाराष्ट्र पत्रकार संघाच्या उपक्रमांचे कौतुक केले व हा पुरस्कार प्रेरणा देणारा आहे असे प्रतिपादन केले.
यावेळी चंद्रशेखर कदम, तृप्ती देसाई, विलासराव कोळेकर तसेच उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी प्रा. किरण गोंटे, प्रा. अनिल बेंद्रे, प्राचार्या अल्फोन्सा डी, पांडुरंग गुंजाळ,  प्राचार्य लक्ष्मीकांत आहेर, प्राचार्य डॉ. भाऊसाहेब आंधळे, प्राचार्य सोपानराव जाधव,  स्मिता पराड,  प्राचार्या तिलोत्तमा कर्डिले,  दिलीप मंडलिक आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे व्यवस्थापन उत्तमराव भोसले यांनी तर सूत्रसंचालन निलेश परबत यांनी केले.