Breaking News

मुंबईचा ’सिद्धीविनायक’ मराठवाड्यातील ’जलयुक्त शिवार’ला पावला...

औरंगाबाद, दि. 21 - श्री. सिध्दीविनायक गणपती मंदिर (प्रभादेवी) मुंबई यांच्याकडून मराठवाड्यातील जलयुक्त शिवार अभियानाकरीता प्रति जिल्हा एक कोटी या  प्रमाणे आठ कोटी रक्कमेचा धनादेश संस्थानचे अध्यक्ष श्री. नरेंद्र राणे यांनी विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्याकडे सुपूर्द केला.येथील विभागीय आयुक्त  कार्यालयात आयोजित छोटेखानी बैठकीत हा धनादेश सुपुर्द करण्यात आला. यावेळी श्री. सिध्दीविनायक गणपती मंदिर संस्थानचे विश्‍वस्त ऍड हरिश सणस, रोहयोचे  प्र.उपायुक्त अनंत कुंभार, औरंगाबाद महसुल विभागातील सर्व जिल्हृयाचे उपजिल्हाधिकारी यांची उपस्थिती होती. यानंतर डॉ. भापकर यांनी सदर धनादेश प्रति जिल्हा  1 मराठवाड्यातील जलयुक्त कामासाठी श्री. सिध्दीविनायक गणपती मंदिर संस्थानतर्फे आठ कोटींची मदत कोटी रुपये या प्रमाणे रक्कमेचा धनादेश उपजिल्हाधिकारी  यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी संस्थानचे अध्यक्ष श्री. नरेंद्र राणे म्हणाले की, सदर अभियानास निधी उपलब्ध करण्याबाबत मा. मुख्यमंत्री यांनी केलेल्या आवाहनास  तात्काळ प्रतिसाद देऊन सदर अभियानास निधी उपलब्ध करुन देण्याचा श्री गणेशा श्री सिध्दीविनायक न्यासाने करुन, सर्वप्रथम महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यांना प्रति  जिल्हा रु.1 कोटी प्रमाणे रु. 34 कोटी इतके अर्थसहाय्य मार्च व एप्रिल 2015 मध्ये वितरित केले. तद्नंतर मार्च 2016 मध्ये प्रति जिल्हा रु. 19 लक्ष 11 हजार या  प्रमाणे 34 जिल्ह्यांना रु. 6 कोटी 50 लक्ष इतके अर्थसहाय्य वितरित केले. सदर निधीतून करण्यात आलेल्या विविध जलसंवर्धनाच्या कामांमुळे राज्यातील अनेक  जिल्ह्यांमध्ये पाण्याच्या पातळीत वाढ त्याच प्रमाणे पाण्याची साठवणूक झाली आहे. याचा फायदा राज्यातील शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणात झाला आहे. विभागीय  आयुक्त श्री भापकर म्हणाले की, मराठवाड्यात औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद आणि परभणी या जिल्ह्यात जलयुक्त शिवारचा निधी मोठ्या प्रमाणात खर्च झाला  असून एकूण मराठवाडा विभागात 84.65 टक्के खर्च जलयुक्त शिवार अभियानात झाला आहे. मराठवाड्यात जलयुक्त शिवारच्या कामांसाठी 40 गावांची निवड करण्यात  आली असून 324 कामे हाती घेण्यात आली आहे. त्यापैकी 273 कामे पूर्ण झाली असून 29 कामे सध्या सुरु आहेत असे त्यांनी सांगितले.