देशातील बेरोजगारीबाबत राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
नवी दिल्ली, दि. 09 - राष्ट्रपतीपदाचा एका महिन्याचा कार्यकाळ शिल्लक असताना राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी देशातील बेरोजगारीच्या मुद्यावर चिंता व्यक्त केली आहे. दरवर्षी रोजगार क्षेत्रात कोट्यवधी युवक पाऊल ठेवत असतात. मात्र, त्या प्रमाणात नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होत नाहीत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशनच्या हीरक महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
उद्योग सुरू करण्यासाठी पूर्ण प्रशिक्षण देणार्या व्यवस्थापन शिक्षणाची नितांत गरज आहे. दरवर्षी रोजगार क्षेत्रात पाऊल ठेवणार्या युवकांची संख्या एक कोटी असून त्या प्रमाणात नव्या रोजगाराच्या संधी निर्माण होत नाहीत. यासाठी आपल्याला ‘स्टार्ट अप’वर भर द्यावा लागेल. याबरोबर लघुद्योगांना प्राधान्य द्यायला हवे, असे ते म्हणाले.
आपल्या देशाकडे सध्या सर्वाधिक युवाशक्ती आहे. आपल्याकडे असलेली ही शक्ती रोजगार उत्पादकतेमध्ये रुपांतरित झाल्याशिवाय आपल्याला अपेक्षित योग्य लाभ मिळणार नाही, असेही त्यांनी सांगितले. देशातील युवकांना अधिकाधिक रोजगार देण्यावर भर देण्यासह त्यांच्यासाठी नवीन रोजगार संधी निर्माण करण्याची आवश्यकता त्यांनी प्रतिपादित केली.