बीएमडब्ल्युच्या सातव्या जनरेशनमधील 5 वी सिरीज लवकरच भारतात दाखल
नवी दिल्ली, दि. 09 - बीएमडब्ल्युच्या सातव्या जनरेशनमधील 5 वी सिरीज जून अखेरीपर्यंत भारतात दाखल होण्याची शक्यता आहे. या गाड्यांना गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय बाजारात विक्रीसाठी दाखल केले होते. या गाड्यांमध्ये कमां आयड्रायव्हिंग सिस्टीम बसविण्यात आली असून वायरलेस चार्जिंगसह अनेक सुविधा देण्यात आल्या आहे. भारतात दाखल करण्यात येणा-या गाडीमध्ये आकर्षक ऑटोमॅटिक ड्रायव्हिंगची सोय नसण्याची शक्यता आहे. या गाड्यांची आगाऊ नोंदणी मागच्या महिन्यापासून सुरु करण्यात आली आहे. ही गाडी फ्लॅगशिप बीएमडब्ल्युच्या सिडॅन प्रकारापेक्षा जास्त आकर्षक आहे.
गाडीच्या पाचव्या सिरीजमध्ये इंजिनचे तीन प्रकार देण्यात आले हेत. यात एक पेट्रोल आणि दोन डिझेल आहेत. 55 ते 65 लाख रुपयांच्या किंमतीची ही गाडी भारतात 29 जून रोजी दाखल होण्याची शक्यता आहे.
गाडीच्या पाचव्या सिरीजमध्ये इंजिनचे तीन प्रकार देण्यात आले हेत. यात एक पेट्रोल आणि दोन डिझेल आहेत. 55 ते 65 लाख रुपयांच्या किंमतीची ही गाडी भारतात 29 जून रोजी दाखल होण्याची शक्यता आहे.