कपिल मिश्रा यांना वाय दर्जाची सुरक्षा
नवी दिल्ली, दि. 09 - आम आदमी पक्षातून निलंबित केलेले माजी मंत्री कपिल मिश्रा यांच्या जीवाला धोका असल्यामुळे त्यांना दिल्ली पोलिसांनी वाय दर्जाची सुरक्षा पुरविली आहे. त्यामुळे पोलीस सेवेतील दोन अधिकारी प्रत्येक वेळी त्यांना सुक्षा पुरविणार आहे. या अधिका-यांपैकी एक अधिकारी गणवेशात तर दुसरा गणवेशाशिवाय असणार आहे.
मिश्रा यांच्यावर कधीही प्राणघातक हल्ला होऊ शकतो, असे विशेष पथकाने कपिल मिश्रा यांच्या सुरक्षा आढावा अहवालात नमूद केले आहे. आढावा पथकाने पोलीस आयुक्त अमूल्य पटनायक आणि सुरक्षा विंगचे विशेष आयुक्त अरविंद दीप यांना अहवाला पाठविला आहे. त्यानुसार मिश्रा यांना यांना विशेष सुरक्षा पुरविण्यात आली आहे. तसेच त्यांना पुरविण्यात आलेल्या सुरक्षेकडे लक्ष ठेवले जाणार असून आवश्यकतेनुसार सुरक्षेमध्ये वाढ अथवा कपात करता येणार आहे.