Breaking News

नेदरलँड्समध्ये क्रिकेटपटू रैनाने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदी यांची भेट

मस्टरडॅर्म, दि. 29 - पंतप्रधान मोदी तीन देशांच्या दौ-यावर असताना मंगळवारी नेदरलँड्समध्ये क्रिकेटपटू सुरेश रैना आणि त्याची पत्नी प्रियांका या दोघांनी मोदी  यांची भेट घेतली. रैनाने ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली. रैनाची पत्नी प्रियांका ही मूळची मस्टरडॅमची असल्यामुळे रैना नेदरलँड्सला सुटीसाठी गेला आहे.  त्याच वेळी ही भेट झाली. ‘एका दूरदर्शी नेतृत्वाला भेटून आनंद झाला. नेदरलँड्समधील त्यांच्या दौ-यादरम्यान त्यांनी मला भेटीसाठी वेळ दिला त्यासाठी मी त्यांचा  आभारी आहे, असे रैनाने ट्विट केले आहे. तसेच, रैना आणि प्रियांका यांनी मोदींची भेट घेताना काढलेले छायाचित्र रैनाने ट्विटरवर अपलोड केले असून त्यात  पंतप्रधान मोदी यांनाही टॅगदेखील केले आहे.