योगी रामदास पुण्यतिथी निमित्त दीड लाखांच्या मसाल्याची आमटी, साठ हजार चपात्यांचा महाप्रसाद
अकोले, दि. 08 - येथे आमटीसाठी दीड लाखाचा मसाला आणि साठ हजार चपात्यांचा महाप्रसाद, योगी रामदासबाबा पुण्यतिथी सोहळ्या निमीत्त महाप्रसादाचे वाटप बेलापूर (ता. अकोले) येथे योगी रामदासबाबा यांच्या 148 व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमीत्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्या अंतर्गत काल (जेष्ठ शु. द्वादशी) गावातून प्रत्येक घरातून भाविकांना प्रसादासाठी दिलेल्या चपात्या (साठ हजार चपात्या) आणि आमटीसाठी दीड लाख रुपयांचा मसाला असा वैशिष्ठ्यपूर्ण महाप्रसादाचा आस्वाद काल उपस्थित भाविकांना चाखायला मिळाला. मोठ्या श्रद्धेने या प्रसादाचा आस्वाद भाविकांनी घेतला.
सप्ताह काळात अनेक नामवंतांच्या कीर्तन, प्रवचनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. यात आप्पासाहेब महाराज महाले, सोमनाथ महाराज भोर, बबन महाराज गोपाळे, बापु महाराज शेळके, डॉ. एम. डी. फापाळे, गोविंद महाराज हांडे, पांडुरंग महाराज उकिरडे, नामदेव महाराज फापाळे यांचे प्रवचन आयोजित करण्यात आले होते. तर बाबा महाराज खामकर, नामदेव महाराज पराड, गुलाब महाराज करंजुले, मुक्तानंद गिरी महाराज, विवेक महाराज केदार, दत्तात्रय महाराज भोर, रोहिदास महाराज हांडे, प्रकाश महाराज पवार यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पांडुरंग महाराज आव्हाड यांच्या काल्याच्या कीर्तनाने या सोहळ्याची सांगता झाली. त्यात महाराजांनी रामदास स्वामींच्या कार्याचा आढावा घेतला व क्रुष्ण लीलांचे वर्णन केले.
योगी रामदासबाबा यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमीत्त सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. यात नामांकित कीर्तनकारांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. सप्ताहाच्या निमित्ताने मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आल्याने संध्याकाळी मंदीर परिसरात एक रोषणाई व भावपूर्ण वातावरण पाहायला मिळत आहे. अशी माहिती देवस्थानच्या वतीने देण्यात आली. काल सकाळ पासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनात ग्रामस्थ, पुणे, मुंबईकर यांच्यासह सर्वच झटताना दिसत होते. संध्याकाळी पालखी सोहळ्यानंतर उपस्थित भाविकांना आमटी, चपातीचा महाप्रसाद देण्यात आला. यावेळी परगावी नोकरी निमीत्ताने गेलेले नोकरदार जेवणानंतरचे भांडी- कुंडी स्वच्छ करीत होते हे विशेष.
सरपंच जालिंदर फापाळे, हौशीराम जाचक, लिलाधर महाले, अशोक फापाळे, गुलाब महाले, प्रकाश फापाळे, बबुशा महाले, दत्तात्रय महाले, मनोहर फापाळे, सुरेश फापाळे, बाळासाहेब महाले, गीताराम फापाळे, पांडुरंग उकीरडे, संभाजी काळे, भाऊसाहेब कोकाटे, बबनराव काळे, रमेश फापाळे, राजेंद्र डोंगरे, निलेश फापाळे, बापू कुलकर्णी, रोहिदास फापाळे, अमृता फापाळे, गणेश फापाळे, रभाजी फापाळे, संजय बेल्हेकर, सुरेश महाले, एम. के. फापाळे, विठ्ठल महाले, रोहिदास कोकाटे, दिलीपशेठ कोकाटे, सदाशिव गोपाळे, गंगाराम काळे, भारत शिरसाठ, चंद्रकांत महाले, संदीप महाले, सुदाम महाले, संजय उकीरडे, दशरथ फापाळे, भाऊसाहेब फापाळे, गोपीनाथ कोकाटे, शंकर काळे, विकास महाले, विलास खेबडे, भाऊसाहेब खेबडे, भाऊ फापाळे, उत्तम शिरसाठ, उत्तम कोकाटे, किसन फापाळे, लहू काळे, दादाभाऊ उकीरडे, सुरेश खेबडे, रमेश लांडे, दत्ता लांडे, भिमा आल्हाट यांच्यासह ग्रामस्थ, पुणे, मुंबईकर हे सकाळ पासून कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करत होते.
बेलापूर येथील आमटी बनविणारे आचारी किसन फापाळे हे गेल्या 44 वर्षापासून महाप्रसादासाठी लागणारी आमटी बनवत असून याबाबत त्यांना विचारले असता त्यांनी मला यात्रोत्सवाच्या निमित्त बेलापूर येथे येत असलेल्या एका अज्ञात व्यक्तीने आमटी बनविण्याची कला शिकवली आहे. दरवर्षी मी आमटी मध्ये प्रत्येक मसाल्यात 50 ग्रॅमची वाढ करत आलो असून योगी रामदास बाबांच्या कृपेने आज 44 वर्षानंतर ही माझ्या हाताने पुर्वी जशी आमटी तयार व्हायची तशीच आजही होत आहे. मठ, तूर, हरभरा, मूग अशा विविध डाळींचा वापर करत ही आमटी बनविली जाते. यासाठी आठ दिवस विविध मसाल्यांचे नियोजन करावे लागते. बेलापूरची आमटी चपाती हा प्रसाद प्रसिद्ध असून पंचक्रोशीतील ग्रामस्थाचा लाभ घेतात व तृप्त होतात.