Breaking News

शाळा प्रगत करण्यावर भर दिला जाणार- ठोके

संगमनेर, दि. 08 - शैक्षणिक गुणवत्ता विकासाकरीत केंद्रनिहाय कृतीकार्यक्रम तयार करण्यात येणार आहे.त्यामुळे मागे पडणार्‍या शाळा आणि विद्यार्थी केंद्रस्थांनी ठेवून डिसेंबर अखेर प्रगत करण्यावर भर दिला जाणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायीक विकास संस्थेच्या प्राचार्य श्रीमती सी.आर.ठोके यांनी केले.
जिल्हा शैक्षणिक गुणवत्ता कक्षाच्या बैठकीत अध्यक्षपदावरून त्या बोलत होत्या. यावेळी अहमदनगर जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस, निरंतर शिक्षणाधिकारी श्रीमती. ठुबे उपस्थित होते.
श्रीमती ठोके म्हणाल्या, राज्यात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाची प्रभावी अमंलबजावणी सुरू आहे.त्यात अहमदनगर जिल्हा हा पहिल्या पाचमध्ये आहे.अशा परीस्थीत जिल्हयात या कार्यक्रमाची अमंलबजावणी आणखी प्रभावी करीत वरच्या क्रमांकावर जाण्यासाठी प्रयत्नशील राहावे लागणार आहे. त्याकरीता केंद्रनिहाय माहिती संकलन करून ज्या क्षेत्रात मुले मागे आहेत तेथे पर्यवेक्षकीय यंत्रना मार्गदर्शन करणार आहे. सर्व मुलांना किमान क्षमता प्राप्त होणे आवश्यक आहे. त्याकरीता शिक्षकांच्या अडचणी जाणून त्यावर मात करण्यासाठी मदत करण्यात येणार आहे. शिक्षकांना वेळोवेळी निर्माण होणार्‍या प्रश्‍नांची उत्तरे देण्याकरीता हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे तात्काऴ प्रश्‍नांची उत्तरे दिली जाणार आहे. त्यातून गुणवत्ता उंचावण्याकरीता निश्‍चित मदत होईल असे मत व्यक्त केले.
प्राथमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी सांगितले, जिल्हयाच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ करण्यासाठी पर्यवेक्षकीय यंत्रणा गतीमान करण्यात येणार आहे. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाअंतर्गत शाळां प्रगत करण्याचे उददीष्ट कायम ठेवण्यात आले असून डिंसेबरपर्यंत ते साध्य करण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कटीबध्दता राखण्याचे आवाहन करण्यात आले. या बैठकीत संकलित दोनचे गणिताचे वास्तव संशोधनाचे आधारे सादरीकरण व पुढील कृतीकार्यक्रमाचे सादरीकरण वरीष्ठअधिव्याख्याता लक्ष्मण सुपे यांनी केले. राज्य व अहमदनगर जिल्हा यांचा तुलनात्मक संपादन स्तराचे व भाषा विषयाचे सादरीकरण संदीप वाकचौरे यांनी केले. यावेळी तालुका निहाय गुणवत्तेचे सादरीकरण गटशिक्षणाधिकारी परशराम पावसे, पोपट काळे, गुलाब सय्यद, सुलोचना पटारे, श्रीमती सामलेटी, श्रीमती शेख, श्रीमती शिवगुंडे, चंद्रकात सोनार, सुनिल सूर्यवंशी, बुगे, अनिल शिंदे, खामकर, श्री.पालवे, शिवाजी कराड. श्रीमती कार्ले यांनी सादरीकरण केले. सूत्रसंचालन संदीप वाकचौरे यांनी केले.प्रास्ताविक व आभार लक्ष्मण सुपे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विषय सहाय्यक ज्ञानोबा चव्हाण,आशिष राऊत, श्री बाबंळे यांनी केले.