Breaking News

शहीद संदीप जाधव यांच्या कुटुंबीयांना सेनेकडून पाच लाखांची मदत

औरंगाबाद, दि. 28 - शहीद संदीप जाधव यांच्या कुटुंबीयास सोमवारी शिवसेनेतर्फे पाच लाख रुपयांची मदत करण्यात आली. तर आज मंत्री पंकजा मुुुंडे यांनी संदीप  जाधव यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली सिल्लोड तालुक्यातील केळगाव येथे जाऊन पालकमंत्री रामदास कदम यांनी जाधव कुटुंबीयांची भेट घेतली. पक्षप्रमुख  उद्धव ठाकरे यांच्या वतीने या कुटुंबाला पाच लाख रुपये मदत म्हणून दिले. केळगावातील तरुण मुले देशसेवेसाठी सैन्यात भरती होत असल्यामुळे हे गाव विकास  कामाच्या दृष्टीने दत्तक घेण्याची घोषणा कदम यांनी यावेळी केली. येणा-या एक वर्षात शासनाच्या सर्व योजना गावात राबवण्यात येतील, असे त्यांनी जाहीर केले.  संदीप जाधव यांच्या पत्नीस लवकरात लवकर शासकीय सेवेत घेण्याचे आश्‍वासनही त्यांनी दिले. यावेळी खासदार चंद्रकांत खैरेसह इतर नेते उपस्थित होते.