Breaking News

सिक्किममधील नाथू ला मार्गे जाणारी कैलाश मानसरोवर यात्रा रद्द

नवी दिल्ली, दि. 01 - सिक्किममधील नाथू ला मार्गे जाणारी कैलाश मानसरोवर यात्रा रद्द करण्यात आली आहे.  गेल्या काही दिवसांवपासून चीन आणि भारत सीमे  रेषेवरून वाद सुरू आहे. यामुळे कैलाश मानसरोवर यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, उत्तराखंड मार्गे जाणारी यात्रा सुरूच राहणार आहे, अशी  माहिती एका अधिका-याने दिली. ही यात्रा रद्द केल्यामुळे 400 भाविक निराश झाले आहेत.
नाथू ला मार्गे जाणा-या 50 भाविकांचा चीनने प्रवेश नाकारला होता. सीमे रेषेवर चीनकडून घुसखोरीचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, भारताकडून घुसखोरीचा प्रयत्न सुरू  असल्याचा आरोप चीनने भारतावर केला आहे.