Breaking News

विंडिजच्या स्टेडियमधील स्टँडला सचिनचे नाव देण्यास नकार

त्रिनीदाद, दि. 28 - विंडिजमध्ये उभारण्यात येणा-या ब्रायन लारा स्टेडियममधील एका स्टँडला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचे नाव देण्याची मागणी  फेटाळण्यात आली. खुद्द माझी कर्णधार ब्रायन लारा यानेच ही मागणी केली होती. मात्र, त्रिनीदाद आणि टोबॅगो क्रिकेट मंडळाने ही मागणी फेटाळून लावली.
भारतात भरपूर क्रिकेट स्टेडियम आहेत. पण त्या स्टेडियममधील स्टँडपैकी एकाही स्टँडला विंडिजच्या कोणत्याही ज्येष्ठ खेळाडूचे नाव देण्यात आलेले नाही. तर मग  विंडिजमधील स्टेडियमच्या स्टँडला सचिनचे नाव का देण्यात यावे, असा प्रश्‍न उपस्थित करत मंडळाचे अध्यक्ष अझीम बसाराथ यांनी ही मागणी फेटाळून लावली.