एमआयएमच्या शहराध्यक्षाने मदरशाचे पैसे केले हडप
औरंगाबाद,दि.26 : बेगमपु-यात एका मशीदमध्ये मदरसा सुरू असल्याची खोटी कागदपत्रे सादर करून एमआयएमचे औरंगाबाद पूर्वमधील शहराध्यक्ष शेख मोहंमद नदीम यांनी शासनाकडून तब्बल 6 लाख 40 हजार रुपये हडपल्या प्रकरणी सिटीचौक पोलीस ठाण्यात 420 चा गुन्हासुद्धा दाखल करण्यात आला आहे.
शासनाकडून नोंदणीकृत मदरशाला प्रत्येकी दोन लाख रुपये अनुदान देण्यात येत आहे. एमआयएमचे औरंगाबाद पूर्वमधील शहराध्यक्ष शेख मोहंमद नदीम यांनी बेगमपु-यातील छोटी मशीदमध्ये मदरसा सुरू असल्याचे दाखविले. त्यासाठी त्यांनी‘लोकहित शिक्षण संस्था’ स्थापन केली आणि शासनाकडून 6 लाख 40 हजार रुपये घेतले. या संस्थेत मोहम्मद हम्माद मोहम्मद रफी, शेख मोहम्मद इलियास, शेख फरलिन तबस्सूम खमर पाशा, शेख शफिक यासीन, डॉ. मोहम्मद हादी मोहम्मद रफी, डॉ. इमरान उस्मान आदींची नेमणूकही करण्यात आली होती सदर फिर्याद मुनवर अहमद नईम अहमद (रा. पाटणी कॉम्प्लेक्स, कबाडीपुरा) यांनी याविषयी सिटीचौक पोलीस ठाण्यात नोंदविली.