Breaking News

राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत नाही ; सुषमा स्वराज यांची स्पष्टोक्ती

नवी दिल्ली, दि. 18 - राष्ट्रपती पदासाठी आपण दावेदार नाही , असा खुलासा परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी केला आहे. . राष्ट्रपती पदासाठी स्वराज यांचे नाव  सर्वांत आघाडीवर असल्याची चर्चा सुरू होती. मात्र, या चर्चेला पूर्णविराम देत स्वराज यांनी हे वृत्त फेटाळून लावले. 
राष्ट्रपती पदासाठी तुमच्या नावावरही चर्चा सुरू असल्याचा प्रश्‍न स्वराज यांना विचारला असता त्या म्हणाल्या, या बाबतचे वृत्त पसरवले जात आहे. ही केवळ अफवा  आहे. यावर विश्‍वास ठेऊ नका.
सत्ताधारी आणि विरोधी पक्षाने अद्यापही राष्ट्रपतीपदासाठी उमेदवारांच्या नावाची घोषणा केली नाही. 17 जुलै रोजी राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होणार आहे.