जेट एअरवेजच्या निलंबित वैमानिकाचा हरभजन सिंगविरोधात मानहानीचा दावा
नवी दिल्ली, दि. 18 - जेट एअरवेजमधून निलंबित करण्यात आलेल्या बर्न होस्लिन या वैमानिकाने भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज हरभजन सिंगविरोधात मानहानीचा दावा केला आहे. . होस्लिन याने वर्णभेदी टिप्पणी केली , असा आरोप हरभजनने केला होता . यानंतर जेट एअरवेजने होस्लिन याला निलंबित केले होते. होस्लिनने हरभजन याच्यासह आणि पूजा सिंग गुजराल आणि जतिंदर सिंगवरही मानहानीचा खटला दाखल केला असून सुमारे 96 कोटी रूपयांची नुकसान भरपाईची मागणी केली आहे. .
26 एप्रिल रोजी हरभजन सिंग आपल्या पूजा सिंग गुजराल आणि जतिंदर सिंग या मित्रांबरोबर चंदीगड - मुंबई विमानात प्रवास करत होता. विमानात जतिंदर आणि होस्लिन यांच्यात वाद झाला. या वादानंतर होस्लिन याने आपल्याला उद्देशून वर्णभेदी टिप्पणी केली होती , असा आरोप हरभननने केला होता.