झाकिर नाईकच्या फेसबुक पेजवर तात्काळ बंदी आणण्यासाठी तक्रार
नवी दिल्ली, दि. 06 - वादग्रस्त मुस्लिम धर्मोपदेशक झाकिर नाईकच्या फेसबुक पेजवर तात्काळ बंदी आणण्यासाठी गोवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याचे वृत्त आहे. यामुळे नाईकच्या अडचणीत आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे. नाईक आणि त्याच्या इस्लामिक रिसर्च फाउंडेशनविरोधात तक्रार दाखल करून कारवाई करण्यात आली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणाद्वारेही नाईकची चौकशी सुरू आहे. दहशतवादाच्या समर्थनार्थ चिथावणीखोर भाषणे आणि पैशांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप नाईकवर करण्यात आला आहे. या आरोपानंतर नाईक फरार झाला आहे.