जागतिक स्तरावर मांसाच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता
नवी दिल्ली, दि. 06 - केंद्र सरकारने पशू हत्या रोखण्यासाठी प्रयत्न सुरु केले. मात्र, यामुळे पुढील काळामध्ये जागतिक स्तरावर मांसाच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता असल्याचे जागतिक व्यापार विश्लेषकांचे मत आहे. केंद्र सरकारने पशूंच्या विक्रीवर निर्बंध घातल्यानंतर अवघ्या दोन आठवड्यानंतर जागतिक स्तरावर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. भारताकडे सर्वात जास्त मांस निर्यातदार देश म्हणून पाहिले जाते.
भारत वर्षामध्ये चार अब्ज डॉलर रुपये किंमतीच्या मांसाची निर्यात करत असतो. मात्र, सरकारने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी होण्यास वेळ लागेल. या निर्णयामुळे जागतिक स्तरावर मांसाचा तुटवडा निर्माण होणार आहे, असे एका अहवालात नमूद करण्यात आले आहे.
शिकागो व्यावसाय बाजारात मांसच्या किंमतीत 2.5 टक्क्यांची वाढ झाली आहे. ही वाढ भारताने घेतलेल्या निर्णामुळे झाली आहे असे सांगण्यात येत आहे.