Breaking News

जीएसएलव्ही मार्क - 3 चे प्रक्षेपण यशस्वी

नवी दिल्ली, दि. 06 - भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोने जीएसएलव्ही मार्क -3 या स्वदेशी बनावटीच्या उपग्रह प्रक्षेपकाचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात  आले. आंध्र प्रदेशमधील श्रीहरिकोटा अंतराळ संशोधन संस्थेत आज संध्याकाळी 5.28 वाजता उपग्रह प्रक्षेपकाचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. या प्रक्षेपकाद्वारे  जीसॅट-19 हा दळणवळण उपग्रह अवकाशात पाठवण्यात आला.
या पूर्वी भारताला 2.3 टनापेक्षा जास्त वजनाचे उपग्रह अंतराळात सोडण्यासाठी परदेशात जावे लागत होते. मात्र, आता जीएसएलव्ही मार्क-3 मुळे आपल्याचा चार  टन वजनाचा उपग्रह अवकाशात पाठवणे आता शक्य होणार आहे.
जीएसएलव्ही मार्क-3 च्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून इस्रोचे अभिनंदन केले.