Breaking News

पाटणा-नवी दिल्ली इंडिगोच्या विमानाचे टायर फुटले; सर्व प्रवासी सुखरूप

नवी दिल्ली, दि. 01 - पाटणा विमानतळाच्या धावपट्टीवर इंडिगोच्या विमानाचे टायर फुटल्याचे वृत्त आहे. इंडिगोचे 508 हे विमान पाटण्याहून दिल्लाला जात होते.  विमानातील सर्व प्रवासी सुखरूप असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर पाटण्याहून ये - जा करणारी विमान सेवा रद्द करण्यात आली आहे.
पाटणा विमानतळावर विमानाचे टायर फुटले आहे. या घटनेमुळे अति महत्वाची व्यक्ती विमानतळावर अडकले आहेत. संसदेत मध्यरात्री होणार्‍या वस्तू आणि सेवा  करच्या विशेष कार्यक्रमात सहभागी होण्याची दिल्ली जाणार होते, अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते सुशील मोदी यांनी दिली.  पाटण्याहून येणारी सर्व  विमाने वळविण्यात आली आहे. रांचीहून पाटण्याला येत असलेले राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांचेही विमान पुन्हा रांचीच्या दिशेने वळवण्यात आले  आहे.