Breaking News

बलात्कार पीडित महिलेची गोपनीय माहिती उघड केल्याप्रकरणी उबेरच्या प्रमुखाची हकालपट्टी

नवी दिल्ली, दि. 09 - अमेरिकन कॅब कंपनी उबेरने आशिया-पॅसिफिक विभागाचे प्रमुख एरिक अलेक्झांडर यांची हकालपट्टी केली. बलात्कार पीडित महिलेची  गोपनीय माहिती उघड करून त्या महिलेचा वैद्यकीय अहवाल प्रसिद्ध केल्याचा आरोप अलेक्झांडर यांच्यावर आहे. यामुळे त्यांना कामावरून काढून टाकण्यात आले.  काही महिन्यांपर्वीच कंपनीने भेदभाव आणि गैरवर्तन केल्याच्या आरोपाखाली आपल्या 20 कर्मचा-यांची हकालपट्टी करणार असल्याची घोषणा केली होती.
डिसेंबर 2014 मध्ये दिल्लीत उबर चालक शिव कुमार यादव याने एका महिलेवर बलात्कार करून तिला मारहाण केली होती. अलेक्झांडर यांनी त्या महिलेकडून  वैद्यकीय अहवाल मागितला होता. यानंतर अलेक्झांडर यांनी तो अहवाल उबेरचे मुख्य कार्यकारी अधिकारी ट्रॅव्हस कॅलनिल आणि वरिष्ठ उपाध्यक्ष एमिल मायकल  यांच्याकडे सोपवला होता. बलात्कार पीडित महिलेची माहिती उघड केल्यामुळे अलेक्झांडर यांच्यावर कारवाई करण्यात आली.